नंदुरबार(महाराष्ट्र)- नंदुरबार जिल्ह्यात बस 40 फूट खोल दरीत कोसळली. बसमधील 5 प्रवासी ठार झाले आहेत आणि 35 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस बुलढाण्यातील मलकापूर येथून सुरतला जात होती. जखमी झालेल्या 35 प्रवाशांना नंदुरबार येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी बऱ्याच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
{वाचा-भाजपच्या सभेत वृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले, "तरीही भाषण सुरूच होते आणि भाजपचे नेते निर्लज्जपणे टाळ्या वाजवत होते."}
नंदुरबारचे एसपी महेंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये जवळपास 40 हुन अधिक प्रवासी प्रवास करत होते. बस विसारवाडी जवळील कोदईबारी घाटाजवळ पोहोचली होती. तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 40 फूट खोल दरीत कोसळली.
बस सरळ म्हणजे समोरच्या भागाकडून दरीत कोसळली. यामुळे चालक, क्लीनर आणि अन्य तीन प्रवासी घटनास्थळी ठार झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. नंदुरबार अग्निशमन दल आणि पोलीस स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी पोहोचवत आहे.
Five persons dead and around 35 injured after the bus they were travelling in fell into a gorge near Khamchoundar village in Nandurbar. The injured have been taken to a hospital. Rescue operation underway: Mahendra Pandit, SP Nandurbar. #Maharashtra pic.twitter.com/I0QYnrMisd
— ANI (@ANI) October 21, 2020
0 टिप्पण्या