![]() |
गोरेगाव- गोरेगावत चालू असलेल्या स्टार बारवर पोलिसांनी अर्ध्या रात्री छापा मारला. बारमधे असलेले 15 ग्राहक व इतर 20 जनांना पोलिसांनी अटक केले. जेव्हा छापा टाकला होता तेव्हा 11 लेडीज बार डान्सर फ्लोअर वर डान्स करत होत्या. सगळ्यांना बारमधून रेस्क्यू केले आणि शनिवारी सकाळी सोडून देण्यात आले. जेव्हा बारमध्ये पोलिसांनी एंटरी झाली तेव्हा लोक बार डान्सरवर नोटा उडवताना आढळले. बरेच लोक अश्लील चाळे करतानासुद्धा निदर्शनास आले.
गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेले लोक हे स्टार बारचे वेटर,स्टार बारचा सुपरवायझर,बारचा कॅशियर आणि मॅनेजर सामील आहेत. याव्यतिरिक्त 15 ग्राहकही पोलिसांच्या अटकेत सापडले आहेत. 15 ग्राहकांना pandemic act चे उल्लंघन केल्याच्या आणि अश्लीलता पसरवण्याच्या गुन्ह्यांतर्गत अटक केले आहे.
0 टिप्पण्या