संत राम सिंह यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.सोबत त्यांनी एक सुसाईड नोट(चिठ्ठी) ही लिहून ठेवली आहे.त्यामध्ये लिहिले आहे की, अन्यायाविरुद्ध हा एक आवाज आहे.सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.अन्याय करणे आणि अन्याय सहन करून घेणे हे पाप आहे.दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंध कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी त्यांच्या या आत्महते बद्दल दुःख जाहीर केले आहे.
संत राम सिंह यांनी कोंडली बॉर्डरवर आत्महत्या केली आहे.लोकांनी त्यांना पानिपतच्या पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल केले.तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांचे पार्थिव करणाल येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले.बुधवारी संत राम सिंह हे आपल्या सोबतच्या शेतकऱ्यांसोबत कोंडली बॉर्डरवर गेले होते.जाताना ते कारने गेले होते.दिल बहुत दुखी है आप को ये बताते हुए कि संत राम सिंह जी सिंगड़े वाले ने किसानों की व्यथा को देखते हुए आत्महत्या कर ली। इस आंदोलन ने पूरे देश की आत्मा झकझोर कर रख दी है। मेरी वाहेगुरु से अरदास है कि उनकी आत्मा को शांति मिले
— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) December 16, 2020
आप सभी से संयम बनाकर रखने की विनती 🙏🏻 pic.twitter.com/DyYyGmWgGg
त्यांचे सोबती गुरमित यांनी सांगितले आहे की, संत राम सिंह हे आम्हास म्हटले की तुम्ही प्रार्थना करण्यासाठी स्टेजवर जा. मी प्रार्थना करण्यासाठी स्टेजवर गेलो.त्यानंतर गाडीचालक चहा प्यायला निघून गेला.तेंव्हा त्यांच्यासोबत कोणीही नव्हते.यादरम्यान त्यांनी स्वतःवर गोळी झाडली.
0 टिप्पण्या