![]() |
Image source-pixabay |
लॉकडाऊन आता राहिलेले नाही. शाळा,कॉलेज,धार्मिक स्थळं, व्यायामशाळा ह्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेपर्यंत चालू करण्यात येतील. दिवाळीपूर्वी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रा अनलॉक होईल, अशी अपेक्षा करू. असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
चार लाख रेस्टॉरंट-बार आणि रेल्वे हे अनलॉक-5 मध्ये चालू करण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालये,धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवानगी देण्यात येईल असे राजेश टोपे म्हणाले.पुन्हा जर कोरोनाची
साथ वेगाने आलीच तर राज्यात तेवढी आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसेल. सर्व अनलॉक एकाच वेळी करण्याची मुख्यमंत्री यांची इच्छा नाही
काय सुरू होणार?
लोकल रेल्वे सेवा
व्यायामशाळा
सर्व धार्मिक स्थळे
स्विमिंग पूल
सिनेमागृह आणि नाट्यगृह
परराज्यातील रेल्वे सेवा
काय बंद राहणार?
शाळा
कॉलेज
शैक्षणिक संस्था
कोचिंग क्लासेस
हे दिवाळीनंतर सुरू होणार
राजकीय,धार्मिक आणि सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम हे बंद राहणार.
सध्या या गोष्टींना परवानगी आहे
अत्यावश्यक वस्तूंचे कारखाने वगळता इतर उत्पादनाचे उद्योगही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातल्या राज्यात लांब पल्याच्या रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतूकिवरचे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार हे सरकारच्या काही अटी आणि नियमासह चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार हे चालू करण्यासाठी सरकारने सरकारची नियमावलीही जाहीर केली आहे.
0 टिप्पण्या