VIDEO:वाढदिवसाला तलवारीने केक कापणे पडले चांगलेच महागात,बर्थडे बॉयसहीत 7 जणांना अटक.

 

वाढदिवसाला तलवारीने केक कापणे पडले चांगलेच महागात,बर्थडे बॉयसहीत 7 जणांना अटक.

मुंबई: वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापणे, कुर्ला येथील एका तरुणास चांगलेच महागात पडले आहे.कापला तर कापला ते दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि बर्थडे बॉयसहीत 7 जणांना अटक करण्यात आले.

घटना आहे कुर्ला नेहरू नगर बस डेपो परिसरातील.येथे राहणाऱ्या एका तरुणाचा ज्याचे नाव आहे समिरुद्दीन जमिरुद्दीन अन्सारी(वय 20) शनिवार रोजी वाढदिवस होता. शनिवारी वाढदिवस असल्यामुळे त्याच्या मित्रांनी शुक्रवारी रात्री 6 केक आणले. केक आणल्यानंतर घराजवळच ते केक चक्क तलवारीने कापण्यात आले. तलवारीने केक कापल्याचे ते दृश्य मित्रांनी मोबाइलवर रेकॉर्ड केले. रेकॉर्ड केलेले ते दृश्य सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले.तो व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


सध्या सर्वत्र कोरोनामुळे असे कार्यक्रम करण्यास बंदी घातली आहे. केक तलवारीने कापला आणि वाढदिवस साजरा करताना कोरोना संबंधीचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत. असे व्हिडिओत दिसून आले. वाढदिवस साजरा करताना सामाजिक अंतर न पाळल्याने,आणि तोंडाला मास्क न बांधल्यामुळे नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजीव गांधी नगरमधील हा व्हिडीओ असल्याचे कळताच पोलिसांनी समिरुद्दीन जमिरुद्दीन अन्सारी यांच्यासह 7 जनांना अटक केली आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. मोहम्मद आसिफ समिउल्हा इदरीसी(वय 19),तौफीक रफीक सेख(वय 22),मिसब अब्बास अशरफ हुसैन सय्यद(वय 19),अरबाज आयूब सेख(वय 23),अमन तनवीर सेख(वय 19) आणि एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या