5 किलो कचरा गोळा करा आणि 30 रुपयांचे फूड कूपन मोफत मिळवा-ठाणे नगरपालिकेची स्कीम.

5 किलो कचरा गोळा करा आणि 30 रुपयांचे फूड कूपन मोफत मिळवा-ठाणे नगरपालिकेची स्कीम.
Image by-pixabuy

 ठाणे: शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळत आहेत.ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे शहरातील कल्याण डोंबिवली नगरपालिकेने एक आगळीवेगळी स्कीम सुरू केली आहे.स्कीम अशी आहे की, लोकांनी 5 किलो कचरा गोळा करून दिला तर त्यांना त्याच्याबदल्यात 30 रुपयांचे फूड कूपन मिळणार आहे. KDMC लोकांना हे फूड कूपन पुरवणार आहे. ही स्कीम KDMC च्या झिरो कचरा पॉलिसी अंतर्गत सुरू केली आहे.


KDMC च्या अधिकाऱ्याने सांगितले की, जो कोणी 5 किलो कचरा गोळा करून कचरा कलेक्शन सेंटरवर जमा करेल, त्या व्यक्तीला 30 रुपयांचे फूड कूपन देण्यात येईल. कचरा जमा करण्यासाठी शहरातील बऱ्याच भागात कचरा कलेक्शन सेंटर उभारण्यात आले आहेत. शहरात दिवसामागे कित्येक टन कचरा निघतो.त्यांनी सांगितले आहे की हे काम करण्यास खाजगी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. आमचे स्वप्न शहराला कचरामुक्त बनवणे आहे.त्यासाठी आम्ही नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या