VIDEO:भररस्त्यात महिला पोलीस लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल,महिला कॉन्स्टेबल निलंबित

 

VIDIO:भररस्त्यात महिला पोलीस लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल,महिला कॉन्स्टेबल निलंबित

बातमी पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील आहे.पिंपरी चिंचवड येथील एका वाहतूक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडी सोडण्यासाठी लाच घेतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून त्या महिला कर्मचाऱ्याने पैसे आपल्या मागच्या खिशात ठेवायला सांगितले.ह्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लाच घेणाऱ्या त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे.



बुधवारी सकाळची ही घटना पिंपरीतील शगुन चौकातील आहे.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लाल रंगाच्या स्कुटीवर एक महिला बसलेली आहे.तिच्यासोबत तिची मुलगीही आहे.काही वेळ त्यांचे बोलणे झाले.त्यानंतर महिलेच्या मुलीने आपल्या पर्समधून काही पैसे काढून त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मागच्या खिश्यात ठेवले.त्यावेळी त्या शगुन चौकात अन्य एक पोलीस अधिकारी आणि तीन ट्रॅफिक कॉन्स्टेबलसुद्धा ड्युटीवर होते.एवढे असूनही महिला वाहतूक कर्मचाऱ्याने आपले ते काम पार पाडले.


लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतरही अधिकारी याविषयावर काही बोलण्यास तयार नाहीत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची इंटर्नल चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. चौकशीत समोर आले की, स्कुटी चालवणाऱ्या त्या महिलेने हेल्मेट घातले नव्हते. दंड भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी ही लाच दिली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या