काय! PM किसान योजनेत 'एवढ्या' बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन पैसे खाल्ले.





एखादी सरकारी योजना आली, की त्यात बरेच बोगस लाभार्थी लाभ घेतात. असाच एक बोगस कारभार सांगली जिल्ह्यात केला गेला आहे. किसान सन्मान निधी योजनेत लाभ घेतलेल्यापैकी १४ हजार २६७ लाभार्थी बोगस असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. या १४२६७ लाभार्थ्यांनी एकूण ११ कोटी ३५ लाख रुपये निधी हडप केला आहे. सांगली जिल्हाधिकारी यांनी ही सर्व रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 'जो बोगस लाभार्थी तातडीने निधी परत करणार नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल' असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात एकूण ४ लाख ५८ हजार ९१० लोकांनी आपली नाव नोंदणी केली होती. यांपैकी १ हजार ६६० अपात्र लाभार्थी व २२ हजार ६०७ आयकर भरणारे अपात्र लाभार्थी यांची यादी सरकारने एका पोर्टलवर जाहीर केली आहे. यामध्ये जे अपात्र लाभार्थी आहेत, त्यांना सरकारकडून घेतलेली रक्कम आता परत करावी लागणार आहे. या योजनेत १ हजार ६६० अपात्र लाभार्थ्यांनी घेतलेली रक्कम तब्बल ८९ लाख ५४ हजार एवढी आहे. व तसेच २२ हजार ६०७ आयकर भरणारे अपात्र लाभार्थ्यांनी घेतलेली रक्कम १० कोटी ४६ लाख ६ हजार एवढी आहे. तरी या बोगस लाभार्थ्यांकडून तातडीने रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तालुका स्तरावर सूचना दिल्या आहेत. बोगस लाभार्थ्यांना नोटिसा पाठवण्याचे काम तालुका स्तरावर चालू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

अपात्र लाभार्थ्यांनी सरकारकडून घेतलेली रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
ठिकाण 
व अपात्र
लाभार्थी
संख्या
घेतलेली
एकूण
रक्कम
 आटपाडी-१४   ६८ हजार रुपये 
 जत-४८  ३ लाख ४ हजार रु.
 कडेगाव-१५९  ७ लाख १० हजार रु.
 कवठेमहांकाळ-१२२  ५ लाख ५० हजार रु.
 खानापूर-३९  २ लाख २२ हजार रु.
 मिरज-७६३  ४५ लाख २४ हजार रु.
 पलूस-१८८  ८ लाख ५८ हजार रु.
 तासगाव-१८४ ९ लाख ८६ हजार रु.
 वाळवा-१२१ ६ लाख २० हजार रु.
 शिराळा-२२ १ लाख १२ हजार रु.

असे एकूण १ हजार ६६० अपात्र लाभार्थी आहेत. व त्यांच्या खात्यात एकूण ८९ लाख ५४ हजार रुपये जमा झालेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या