![]() |
Image by pixabuy |
आज 05 डिसेंबर 2020. आजच्या दिवसाला खास विशेष महत्त्व म्हणजे आज संपूर्ण विश्वात जागतिक माती दिन साजरा केला जातो.
तसे पाहता हिंदू संस्कृतीत निसर्गाची पूजा नेहमीच केली जाते. पशू, पक्षी, प्राणी,वृक्ष तसेच माती यांची पूजा करण्यासाठी हिंदू संस्कृतीत वेगवेगळे दिवस ठरलेले आहेत. आणि आज तर जागतिक माती दिन आहे. आजच्या दिवशी मातीची पूजा केली जाते.
जागतिक माती दिन का साजरा करतात?
जगातील सर्व पशु-पक्षी मातीमुळेच आपले जीवन जगत आहेत. आपण जे खातो ते कोण्या फॅक्टरीत नाही तर मातीतच पिकते. भारतीय संस्कृतीत फार प्राचीन काळापासून मातीला एक विशेष महत्त्व दिले गेले आहे. पूर्वीचे लोकपण मातीची पूजा करत होते. पण त्यावेळी ठराविक दिवस नव्हता.
पण आता 05 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र यांच्याकडून दरवर्षी जागतिक माती दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे शेतकरी आणि सामान्य माणसाला मातीविषयी प्रेम जागरूक करणे होय. आणि त्यांना मातीचे महत्त्व पटवून देणे होय. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या रासायनिक खतांच्या आणि तसेच रासायनिक तणनाशकांच्या वापरामुळे जगातील बरीचशी जमीन नापीक होत चालली आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे मातीचे प्रदूषण होत आहे. मातीतील जैविक गुण कमी होत आहेत.यामुळे मातीची शेती पिकवण्याची क्षमता कमी होत आहे.
त्यामुळे शेतकरी आणि सामान्य माणसाला याविषयी जागरूक करण्यासाठी 20 डिसेंबर 2013 रोजी दरवर्षी 05 डिसेंबरला जागतिक माती दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 टिप्पण्या