दहशतवाद्याला पाणी प्यायला दिले, भारतीय जवानांनी दाखविली मानवता, ट्विटरवरील व्हिडिओ व्हायरल...


कश्मीर- काश्मीरमध्ये भारतीय सेनेचे दहशतवादयांचा खात्मा करण्याचे मिशन सुरू आहे. लगातार भारतीय जवान दहशतवाद्यांची सफाई करण्यात गुंतली आहे. यामध्येही भारतीय सेनेच्या जवानांनी मानवता दाखवली आहे.


भारतीय सेना आणि दहशतवादी यांच्यात होत असलेल्या चकमकीत लगातार दहशतवादी मारले जात आहेत. सोबतच सुरक्षा दल दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी ही देत आहे. अश्यातच भारतीय सेनेकडून ट्विटरवर एक व्हिडिओ share करण्यात आला आहे. 

दोन दहशतवादी एका घरात लपून बसल्याची सूचना भारतीय सेनेला मिळाली होती. लपून बसलेल्या या दाहशतवाद्यांमध्ये पोलिसांचा पळपुटा SPO अल्ताफ हुसेन याचाही समावेश होता. सेनेने घेराबंदी करत दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले. यामधील अल्ताफ हुसैन संधीचा फायदा घेत फरार झाला. पण दुसरा दहशतवादी जहागीर याने आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केल्यानंतर एका जवानाने "त्याला पाणी प्यायला द्या" असे सांगितल्याचे व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर जहागीरच्या वडिलांनी सेनेचे पाय धरून आभार मानले.

जहागीर भट्ट हा 31 वर्षीय दुकानदार असून 13 ऑक्टोबर रोजी चौडोरा येथून गायब झाला होता. त्याचे घरवालेही त्याला शोधत होते. शुक्रवारी सेनेने त्याला एका ऐके-47 रायफलसोबत पकडले. येथे जहागीरने सेनेसमोर आत्मसमर्पण केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या