पूरपरिस्थितीची पाहाणी करायला गेलेल्या आमदाराला संतप्त जमावाने केली चप्पल, बुटांनी मारहाण, तेलंगणातील घटना,व्हिडीओ व्हायरल...

हैदराबाद- महाराष्ट्र आणि तेलंगणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. परतीच्या या पावसाने भरपूर प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रासह तेलंगणातील लोकांना पावसामुळे होणारा भरपूर त्रास सहन करावा लागला आहे. सरकारने जी आकडेवारी जाहीर केली आहे, त्यानुसार कमीतकमी 5 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. लोकांच्या घरांमध्ये तर पाणी शिरलेच पण शेतीही खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


या परतीच्या पावसाने फक्त आर्थिकच नव्हे तर जीवित हानी सुध्दा झालेली आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. तेलंगणातील इब्राहिम पट्टणमच्या बऱ्याच भागातील लोकांना मुसळधार पाऊस आणि पुराचा सामना करावा लागला आहे. या भागातील पुराची परिस्थिती पाहण्यासाठी आमदार साहेब आणि त्यांचे काही समर्थक नेते आले होते. आमदार आणि समर्थक पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाल्यावर तेथील नागरिकांच्या संतापाची मर्यादा ओलांडली. त्यांचा राग अनावर झाला.

{या वर्षी TATA मोटर्सच्या कामगारांना 35 हजार रुपये बोनस! }

संतापलेल्या या नागरिकांनी आमदार आणि त्यांच्या समर्थकांना चप्पल-बुटांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी घडल्याचे समजले आहे. इब्राहिमपट्टणमचे आमदार माचेरेड्डी किशन रेड्डी आणि त्यांचे अन्य टीआरएस कार्यकर्ते यांना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. मेडीपल्ली ह्या पूरग्रस्त भागाला त्यांनी भेट दिली असता,संतापलेल्या नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली. यावेळी संतापलेल्या नागरिकांनी त्यांची गाडीही फोडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ ही ट्विटर वर व्हायरल झाला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या