पुढील आठवड्यात राज्यात "ह्या" जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता-हवामान विभाग

 

पपुढील आठवड्यात राज्यात "ह्या" जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता-हवामान विभाग
Image source- pixabay


मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला भरपूर पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. पण केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून शेतकरी संकटात असतानासुद्धा कोणत्याही प्रकारच्या मदतीची घोषणा आतापर्यंत करण्यात आलेली नाही. अशा संकटातच आता आणखी एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यासारखाच उद्या सोमवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

{वाचा-पूरपरिस्थितीची पाहाणी करायला गेलेल्या आमदाराला संतप्त जमावाने केली चप्पल, बुटांनी मारहाण, तेलंगणातील घटना,व्हिडीओ व्हायरल...}

अनेक जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गेल्या आठवड्यात नदी,नाले आणि ओढ्यांना पूर आले होते. बऱ्याच ठिकाणी घरात पाणी शिरले. घरांच्या भिंती कोळसल्या. घरांच्या भिंती कोळसळल्याने अनेक नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशातच आता सोमवारी पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

महाराष्ट्रावरून नुकताच गेलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातकडे सरकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. 


आंध्रप्रदेशची किनारपट्टी, तामिळनाडू आणि तेलंगणात 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार, तर हवामान खात्याने 20 ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्र वरही होईल असे मत हवामान खात्याने व्यक्त केले आहे.


राज्यात खालील प्रमाणे या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता...

सोमवार- नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक.


मंगळवार- पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर.


बुधवार- औरंगाबाद, बीड, जालना, परभणी,लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर.

तरी नागरिकांनी काळजी घ्यावी.

टीप:- दिलेल्या माहितीमध्ये हवामानानुसार बदलही होऊ शकतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या