आरोपींनी नाव विचारून अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या, पुण्यातील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद,व्हिडिओ व्हायरल...

 

पुणे- ही घटना पुण्यातील वनवाडी परिसरातील आहे. भरदिवसा एका व्यापाऱ्याला गोळ्या घातल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. आरोपीने व्यापाऱ्याला दोन गोळ्या घातल्या आणि पायीच तेथून फरार काढला.यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला आहे व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींना शोधत आहे.



घटना सोमवार सायंकाळची आहे

सदरील घटना ही सोमवारी सायंकाळी घडली आहे. मयूर हांडे (वय 32) असे या जखमी झालेल्या व्यापाऱ्याने नाव आहे. मयुर हांडे हे वाळूचा व्यवसाय करत होते. सोमवारी सायंकाळी श्रीराम चौकात उभे असताना, आधीच दबा धरून बसलेल्या आरोपीने कारमध्ये बसलेले असताना अगदी जवळून दोन गोळ्या घालून आरोपी पसार झाला.

{हे वाचा-चेन्नई कडून सनराईज हैद्राबादचा 20 धावांनी पराभव.}

आधी नाव विचारले...

वनवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर हांडे हे आपल्या काही मित्रांची वाट पहात श्रीराम चौकात थांबले होते. त्यावेळी काही दुचाकीस्वार त्यांच्या जवळ आले. दुचाकीस्वारांनी त्यांना त्यांचे नाव विचारले. त्यानंतर आरोपींनी "आपण कोण आहोत" हेही सांगितले. त्यानंतर एक दुसरा व्यक्ती तिथे हजर झाला व त्याने मयुर हांडेवर हल्ला केला. असे म्हटले जात आहे की, आरोपीने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी हांडे यांच्या गालाला स्पर्श करून निघून गेली.

{हे वाचा- या  वर्षी TATA मोटर्सच्या कामगारांना 35 हजार रुपये बोनस!}

पुण्यात 10 दिवसात चार हत्या...

वनवाडी ते सटे कोंडवा परिसरात गेल्या 10 दिवसांत तीन हत्या झाल्या आहेत. एका घटनेत तर 5 नराधमांनी 24 वर्षीय युवकाची दगडाने ठेचुन हत्या केली. 5 ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या