पोलीस कमिशनरांच्या नावावर फेसबुकवर फेक अकाउंट उघडून गरीब लोकांना पैसे मागितले.

 


पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावावर फेसबुकवर एक फेक अकाउंट उघडले गेले. या आकाऊंटवरून लोकांकडे पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी लोकांना या फर्जी अकाउंट पासून सावध राहण्याचे सांगितले आहे. तसेच या आकाऊंटवरून कोणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी सायबर ब्रँच टीमला ऍक्टिव्ह केले आहे.

Facebook fake account prakaran, pimpri chinchwad Facebook fake account prakaran, krishna mumbai, krishna prakash.
हेच ते अकाउंट


सोशल मीडियावर सक्रिय राहणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार कोण्या अनोळखी व्यक्तीने फेसबुकवर आयुक्त यांच्या नावावर फेक अकाउंट उघडून त्याद्वारे 10000 रुपयांची मागणी केली आहे. त्यांचे नाव घेऊन कोणीही जर पैशाची मागणी केली तर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, अशी त्यांनी अपिलही केली आहे. त्यांच्या नावावरून येणाऱ्या मॅसेजपासून सावध राहावे,अश्या प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीला थारा देऊ नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


फेसबुकला पत्र लिहून सायबर सेलने माहिती मागितली..

आयुक्तांनी प्रकरण समोर आल्यानंतर सायबर सेलच्या टिमला पुढील तपासणी करण्यासाठी नियुक्त केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत फेसबुकला पत्र लिहून त्या फेक अकाउंटचा तपशील मागवला गेला आहे. आपले बोलणे,म्हणणे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे मोठे मोठे कलाकार आणि दिग्गज लोक फेसबुक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. पण गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर फेक अकाउंटचे प्रमाण वाढले आहे. यांवर प्रशासन कार्यवाही करत आहे. फसबूकही यांवर कडक ऍक्शन घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या