सचिनचे रेकॉर्ड तोडण्यासाठी कोहलीला फक्त 23 धावांची गरज

 

सचिनचे रेकॉर्ड तोडण्यासाठी कोहलीला फक्त 23 धावांची गरज

आस्ट्रोलिया सोबतची सिरीज जरी भारत हरला,तरी कप्तान विराट कोहली बुधवारी होणाऱ्या वनडेमध्ये आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो. अशी संधीही त्याला आहे. जर बुधवारी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली 23 धावा करू शकला,तर सर्वात जलद 12 हजार धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये तो सचिन तेंडुलकरच्या पुढे जाईल.

सचिनचे 12 हजार धावा बनवण्यासाठी 300 सामने खेळले आहेत. तेच कोहली सचिन तेंडुलकरच्या 58 सामने अगोदरच हे रेकॉर्ड आपल्या नावे करू शकतो. या अगोदर 10000 धावा बनवण्याचे सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड कोहलीने तोडले आहे. कोहलीने आत्तापर्यंत 250 एकदिवसीय सामन्यात 59.29 च्या सरासरीनुसार 11977 धावा केल्या आहेत.

रिकी पोंटिंगची बरोबरी करण्याचीही संधी
आस्ट्रोलियाच्या विरोधात बुधवारी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात जर कोहली शतक ठोकू शकला तर तो आस्ट्रोलियाच्या रिकी पोंटिंगची बरोबरी करेल. पोंटिंगने आत्तापर्यंत 71 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. तेच कोहली 70 शतके ठोकत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय शतके करण्याचे रेकॉर्ड मात्र सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या