कोरोना काळात जीओ देत आहे तीन महिन्याचे रिचार्ज फ्री? काय खर आहे जाणून घ्या.

 

कोरोना काळात जीओ देत आहे तीन महिन्याचे रिचार्ज फ्री? काय खार आहे जाणून घ्या.
Image by Wikipedia

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की,जीओचा तीन महिन्यांच्या 555 चा रिचार्ज पॅक फ्रीमध्ये दिला जात आहे. कोरोना काळात मुलांच्या शिक्षणासाठी हा पॅक फ्रिमध्ये दिला जात आहे. कोरोना काळातील सद्य परिस्थिती लक्षात घेता हा पॅक फ्रीमध्ये दिला जात आहे असा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे.

असा आहे व्हायरल मेसेज

कोरोनाव्हायरस मुळे, मुकेश अंबानी यांनी 1 दशलक्ष जिओ वापरकर्त्यांना मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी free 555 विनामूल्य रिचार्ज देण्याचे वचन दिले आहे, आपला नंबर रिचार्ज करण्यासाठी खालील निळ्या लिंक वर क्लिक करा. मला विनामूल्य रिचार्ज मिळाले, आपण देखील करू शकता. 

टीप: - खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले विनामूल्य रिचार्ज मिळवा:

 https://rb.gy/rpvrmy 

कृपया लक्षात ठेवाः आपल्याकडे Jio सिम नसल्यास आपण आपल्या कोणत्याही मित्रांना किंवा आपल्या घरात कोणत्याही Jio सिमला हा मॅसेज पाठवू शकता.  आणि रिचार्ज करू शकता  ही ऑफर केवळ 14 डिसेंबर 2020 पर्यंत मर्यादित आहे!

 खरं काय आहे?

  • ‌इंटरनेटवर अशी कुठल्याही प्रकारची बातमी नाही जी या गोष्टीची पुष्टी करेल. 'रिलायन्स जीओ 555 चा 3 महिन्यांचा पॅक फ्रेमध्ये देत आहे' याबद्दल इंटरनेटवर कुठल्याही प्रकारची बातमी मिळाली नाही
  • ‌रिलायन्स जीओच्या ऑइसिएल वेबसाईटवरसुद्धा याबाबत कोणताही अपडेट मिळाला नाही.
  • ‌रिलायन्स जीओच्या कस्टमर केयर अधिकाऱ्याशी याबद्दल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की,रिलायन्स जीओने अद्याप असा कोणत्याही प्रकारचा फ्री प्लॅन सुरू केला नाही.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा मॅसेज पूर्णपणे खोटा आहे. याला बळी पडू नये, असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या