![]() |
Image source-dainik bhaskar |
राजस्थानातील करोली जिल्ह्यातील सपोटरा भागात राहणाऱ्या एक पुजाऱ्यास काही नराधमांनी पेट्रोल टाकून पेटवले. ही घटना बुधवार दि:- 07 ऑक्टोबर रोजी घडली. संबंधित पुजाऱ्यावर जयपूर येथील SMS हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पुजाऱ्याचा गुरुवारी मृत्यू झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी कैलास मीना यास ताब्यात घेतले. बाकी आरोपींचा तपास सुरू आहे.
![]() |
Image source-dainik bhaskar |
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करून म्हटले की "सपोटरामध्ये झालेल्या बाबुराव वैष्णव यांची हत्या अत्यंत दुर्भाग्यवस आणि निंदनीय आहे. सभ्य समाजात अशा कृत्यास स्थान नाही,सरकार या दुःखाच्या वेळी बाबुराव वैष्णव यांच्या परिवारासोबत आहे,घटनेचा मुख्य आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे,कारवाई चालू आहे, आरोपींना माफी मिळणार नाही."
पीडितने म्हटले होते की आरोपी मंदिराच्या जागेवर कब्जा करु इच्छित होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार पीडिताने म्हटले होते-" कैलास मीना आपल्या साथीदारांसह शंकर, नमो, किशन आणि रामलखन यांसह मंदिराच्या बागेत छप्पर लावत होते. मी त्यांना विरोध केला तर पेट्रोल टाकून आग लावली. मी आणि माझा परिवार मंदिराच्या 15 बिघा जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह करत होतो."
{नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत कोरोना संक्रमणच्या बाबतीत जगात #1 ला जाईल, पण....}
वाद कसा सुरू झाला?
बाबुराव वैष्णव हे सपोटरा तहसीलच्या बुकना गावात जुन्या राधाकृष्ण मंदिरात पूजा करत होते. गाववाल्यानी मंदिरासाठी जमीन दान दिली होती. ती रेकॉर्डमध्ये मंदिराच्या नावावर होती. जवळपास एक महिन्यापासून काही लोक त्या जमिनीवर आपला ताबा करू इच्छित होते. पुजाऱ्याने गावच्या पंचांकडे तक्रार केली. गावात 4-5 दिवसांपूर्वी 100 घरांची बैठक घेण्यात आली. यात पंचांनी पुजाऱ्याने समर्थन केले.
मृतकाच्या परिवारास नुकसान भरपाई देण्याची मागणी
पुजाऱ्याच्या मृत्यूची बातमी मिळताच बऱ्याच संगठनांचे लोक SMS हॉस्पिटलसमोर मोर्च्यांचे प्रदर्शन करण्यास पोहोचले. त्यांची मागणी आहे की, मृतकाच्या परिवारास नुकसान भरपाई देण्यात यावी.
0 टिप्पण्या