युट्युबवर बघून बनावट नोटा छापत होते,टोळीच्या म्होरक्यासह तिघेजण अटकेत.

 

आजच्या इंटरनेट जगात काय होईल काही सांगता येत नाही.नाण्याला दोन बाजू असतात ते काही खोटं नाही.इंटरनेटचा चांगला उपयोग आहे तसाच त्याचा काहीजण दुरुपयोग सुद्धा करतात.असाच एक प्रकार छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात घडला आहे.50 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यापासून सुरुवात झाली.यश मिळाले तर मोठ्या नोटा छापायला लागले,आणि बघता बघता लाखो रुपयांचा बनावट नोटांचा ढिगारा लावला. छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात एक 21 वर्षाचा युवक नकली नोट छापणाऱ्यांची टोळी चालवत होता. या प्रकरणात पोलिसांनी म्होरक्यासह इतर तीन युवकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 4 लाख 32 हजार रुपयांच्या नकली नोटा ताब्यात घेतल्या आहेत.  विना कम्प्युटरच्या नोटा छापत होते, महासमुंदचे एसपी प्रफुल्ल ठाकूर यांच्या टीमने मुख्य आरोपी तेजेश्वर दास माणिकपुरी( वय 21 रा.सर्गना आरंग) याच्यासह त्याचे साथी योगेंद्र दास माणिकपुरी आणि रायपूरच्या WRS कोलनिमधील अविनाश फुले यांस अटक केली आहे.मुख्य आरोपी तेजेश्वर याने सांगितले की, युट्युबवर त्यांनी एक व्हिडिओ पाहिला.त्या व्हिडिओत विना कम्प्युटरचे नोट कसे छापले जातात याची माहिती दिली होती. इकडून तिकडून जुगाड करून त्यांनी बॉण्ड पेपर,शाई आणि कलर प्रिंटर जमा केले.ह्या वस्तूंच्या साहाय्याने त्यांनी बनावट नोटा छापण्याचा सराव केला.सुरुवातीला पन्नासची एक नोट छापून ती नोट किराणा दुकानवर दिली.  तेजेश्वर याने ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली. श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी त्या तीन युवकांनी ह्या गोष्टीला व्यवसाय बनवले.ह्या युवकांनी महासमुंद जिल्ह्यातील बऱ्याच भागात नकली नोटा चालवणे सुरू केले.काल म्हणजे रविवारीपण बनावट नोटाचे बंडल घेऊन ते खपवण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांच्या खबऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी ह्या तिन्ही आरोपींना अटक केली.त्यावेळी त्यांच्याकडे 2000,500,200,100 आणि 20 रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या. एकूण 4,32,860  एवढी रक्कम त्यांच्याकडे सापडली.तसेच पोलिसांनी आरोपींकडील HP कंपनीचे कलर प्रिंटर,कात्री,बॉण्ड पेपर,हिरव्या रंगाचा टेप,प्रिंटरची शाई,कलर स्केच पेन आणि 3 मोबाईल एवढ्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.

आजच्या इंटरनेट जगात काय होईल काही सांगता येत नाही.नाण्याला दोन बाजू असतात ते काही खोटं नाही.इंटरनेटचा चांगला उपयोग आहे तसाच त्याचा काहीजण दुरुपयोग सुद्धा करतात.असाच एक प्रकार छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात घडला आहे.50 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यापासून सुरुवात झाली.यश मिळाले तर मोठ्या नोटा छापायला लागले,आणि बघता बघता लाखो रुपयांचा बनावट नोटांचा ढिगारा लावला. छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात एक 21 वर्षाचा युवक नकली नोट छापणाऱ्यांची टोळी चालवत होता. या प्रकरणात पोलिसांनी म्होरक्यासह इतर तीन युवकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 4 लाख 32 हजार रुपयांच्या नकली नोटा ताब्यात घेतल्या आहेत.


विना कम्प्युटरच्या नोटा छापत होते,

महासमुंदचे एसपी प्रफुल्ल ठाकूर यांच्या टीमने मुख्य आरोपी तेजेश्वर दास माणिकपुरी( वय 21 रा.सर्गना आरंग) याच्यासह त्याचे साथी योगेंद्र दास माणिकपुरी आणि रायपूरच्या WRS कोलनिमधील अविनाश फुले यांस अटक केली आहे.मुख्य आरोपी तेजेश्वर याने सांगितले की, युट्युबवर त्यांनी एक व्हिडिओ पाहिला.त्या व्हिडिओत विना कम्प्युटरचे नोट कसे छापले जातात याची माहिती दिली होती. इकडून तिकडून जुगाड करून त्यांनी बॉण्ड पेपर,शाई आणि कलर प्रिंटर जमा केले.ह्या वस्तूंच्या साहाय्याने त्यांनी बनावट नोटा छापण्याचा सराव केला.सुरुवातीला पन्नासची एक नोट छापून ती नोट किराणा दुकानवर दिली.


तेजेश्वर याने ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली. श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी त्या तीन युवकांनी ह्या गोष्टीला व्यवसाय बनवले.ह्या युवकांनी महासमुंद जिल्ह्यातील बऱ्याच भागात नकली नोटा चालवणे सुरू केले.काल म्हणजे रविवारीपण बनावट नोटाचे बंडल घेऊन ते खपवण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांच्या खबऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी ह्या तिन्ही आरोपींना अटक केली.त्यावेळी त्यांच्याकडे 2000,500,200,100 आणि 20 रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या. एकूण 4,32,860  एवढी रक्कम त्यांच्याकडे सापडली.तसेच पोलिसांनी आरोपींकडील HP कंपनीचे कलर प्रिंटर,कात्री,बॉण्ड पेपर,हिरव्या रंगाचा टेप,प्रिंटरची शाई,कलर स्केच पेन आणि 3 मोबाईल एवढ्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या