![]() |
Image by-pixabuy |
आज 21 डिसेंम्बर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे.आजच्या दिवसाची रात्र मोठी असते,तर दिवस लहान असतो.वेगवेगळ्या शहरात सूर्योदय आणि सूर्यास्तची वेळ वेगवेगळी असते.ह्याचे कारण पृथ्वीचे झुकलेले असणे आहे.
दिवस लहानमोठे का असतात?
आपली पृथ्वी एका कोनात झुकलेली आहे.फक्त पृथ्वीच नाही तर संपूर्ण सूर्यमाला वेगवेगळ्या कोनात झुकलेली आहे.आपली पृथ्वी एक्सिसवर 23.5 डिग्री कोनात झुकलेली आहे.पृथ्वी झुकलेली असल्यामुळे सूर्याची प्रदक्षिणा घालण्यासाठी तिला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा वेळ लागतो.सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडण्याचा वेळही वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा असतो.
आज जगातील सर्वात लहान दिवस आहे का?
नाही.आज पृथ्वीवरील काही देशात सर्वात लहान तर काही देशामध्ये सर्वात मोठा दिवस आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील देशात आजचा सर्वात लहान दिवस आहे,तर दक्षिण गोलार्धातील देशात आजचा सर्वात मोठा दिवस आहे.न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका आणि आस्ट्रेलिया सारख्या देशात आज सर्वात मोठा दिवस असतो.
0 टिप्पण्या