मास्क लावा नाहीतर सेवा करा: मास्क न लावणाऱ्यांना ५ ते १५ दिवसांपर्यंत कोरोना सेंटरमध्ये सेवा करावी लागेल-गुजरात हायकोर्ट

मास्क लावा नाहीतर सेवा करा: मास्क न लावणाऱ्यांना ५ ते १५ दिवसांपर्यंत कोरोना सेंटरमध्ये सेवा करावी लागेल-गुजरात हायकोर्ट

मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणे फार महागात पडणार आहे. नुकताच गुजरात हायकोर्टाने आदेश दिला आहे की जर एखादा व्यक्ती मास्क न लावता फिरत असेल तर त्याला 5-6 तास कोरोना सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची सेवा करावी लागेल. ही सेवा लागतार 5 ते 15 दिवस करावी लागणार आहे. सेवा करण्याचे हे दिवस  विना मास्क पकडल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या वयावर आणि त्याच्या मेडिकल हिस्ट्रीवर अवलंबून असणार आहेत. 


गुजरातमध्ये कोरोना संक्रमनाची दुसरी लाट चालू असताना देखील खूप लोक मास्क वापरताना दिसत नाहीत. अशा लोकांना कोरोना सेंटरमध्ये सेवेच्या अर्जावर गुजरात हायकोर्टाने बुधवार रोजी शिक्कामोर्तब केले आहे आणि सरकारला नोटिफिकेशन जारी करायला सांगितले आहे.


विनामास्क वाल्यांकडून फक्त दंड वसुली पुरेशी नाही

चीफ जस्टीस विक्रम नाथ यांच्या बेंचमध्ये ह्या प्रकरणाची सुनावणी झाली. विनामास्क वाल्यांकडून फक्त दंड वसुली पुरेशी नाही. विनामास्क वाल्यांकडून सेवा करून घ्यायची जबाबदारी सरकारने एखाद्या संस्थेकडे द्यावी. असे बेंचमध्ये म्हटले गेले आहे. तसेच चीफ जस्टीस म्हणाले की हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मास्क लावणे सर्वांसाठी अनिवार्य आहे.


कोरोनाच्या स्थितीवर राज्य सरकारने कोर्टात म्हटले आहे की 108 रुग्णवाहिका सेवा आणि 104 ला मिळणारे फोन कॉल,दवाखान्यात भर्ती होणाऱ्या रुग्णांची संख्या,रुग्णांना दिले जाणारे ऑक्सिजन आणि लसींची कमतरता पाहता गेले काही दिवसांपासून परिस्थिती सुधारली आहे. आणि पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी सुधारेल. सक्तीने नियम लागू करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या