रजनीकांत काढणार नवीन राजनैतिक पार्टी, 31 डिसेंबरला पार्टीची घोषणा करणार

 

रजनीकांत काढणार नवीन राजनैतिक पार्टी, 31 डिसेंबरला पार्टीची घोषणा करणार

दक्षिणचे सुपरस्टार रजनीकांत यांनी एका नवीन राजनैतिक पार्टी बनववण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूका लढवण्याची घोषणाही केली आहे. गुरुवारी बोलताना ते म्हणाले की,31 डिसेंबर रोजी पार्टीची औपचारिक घोषणा केली जाईल. आम्ही खूप मेहनत करू आणि निवडणूकामध्ये यशप्राप्ती प्राप्त करू असेही ते म्हणाले.


रजनीकांत हे मागील काही महिन्यांपासून राजनीतीमध्ये सक्रिय राहत आहेत. पण पहिल्यांदाच त्यांनी एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे. रजनीकांत यांनी पार्टी तयार करून निवडणूक लढविली तर तामिळनाडूच्या राजनीतीत आणखी एका अभिनेत्याचे पदार्पण होईल. याअगोदरपण बऱ्याच अभिनेत्यांनी राजनीतीमध्ये यश मिळवले आहे.


कमल हसनसोबत युती करणार होते

गतवर्षी रजनीकांत यानी कमल हसन यांच्यासोबत युती करण्याची बोली केली होती. ते म्हणाले होते की, राज्यातील जनतेच्या हितासाठी जर कमल हसन सोबत युती करण्याची गरज पडली तर मी नक्की करेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या