जातीच्या नावावरून ठेवलेल्या वस्त्यांची नावे बदलणार, महापुरुषांची नावे दिली जाणार, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

 

जातीच्या नावावरून ठेवलेल्या वस्त्यांची नावे बदलणार, महापुरुषांची नावे दिली जाणार, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय
Image by dainik bhaskar

राज्यातील शहरे आणि गावातील जातिसूचक वस्त्यांची नावे बदलण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेतला आहे. बुधवारी सायंकाळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील बऱ्याच शहरात तसेच गावांत जातीवरून वस्त्यांची नावे ठेवली गेली आहेत. जसे की महारवाडा, बौध्दवाडा,मंगवाडा,ढोर वस्ती,ब्राम्हणवाडा,माळी गल्ली अशा प्रकारची नावे आम आहेत. समाजातील सामाजिक अंतर कमी करण्यासाठी व तसेच सामाजिक सुसंवादासाठी ही नावे बदलली पाहिजे असे शासनाचे म्हणणे आहे.


अशी असतील नवीन नावे

जातीवरून वस्त्यांना पडलेल्या नावांचे नामकरण आता समता नगर,भीम नगर,ज्योती नगर,शाहू नगर,क्रांति नगर असे होतील. याअगोदरपण दलित वस्ती सुधार योजनेचे नाव बदलून अनुसूचित जाती व नव बौद्ध वस्ती विकास योजना असे करण्यात आले होते. त्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आले होते. 


राष्ट्रपतीच्या आदेशानुसार व्यवहारात दलित शब्दाचा वापर न करता इंग्रजीत 'शेड्युल कास्ट' आणि 'नव बौद्ध' आणि मराठीत 'अनुसूचित जाती व नव बौद्ध' या शब्दांचा वापर केला जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या