घराबाहेर झोपलेला चिमुकला बिबट्याचा शिकार, 15 दिवसात 3 चिमुकले बिबट्याचे शिकार.

 

घराबाहेर झोपलेला चिमुकला बिबट्याचा शिकार, 15 दिवसात 3 चिमुकले बिबट्याचे शिकार.

अहमदनगर-जिल्ह्यातील पाथर्डी तहसीलच्या घाटशिरस गावात घडलेली घटना. 5 वर्षाचा चिमुकला एकटाच घराबाहेर खाटेवर झोपला होता. गुरुवारी रात्री उशिरा जंगलातून आलेल्या बिबट्याने त्याला आपली शिकार बनवले. बिबट्याने घराबाहेर झोपलेल्या चिमुकल्याला तोंडात धरून शेतात नेले. घरचे लोक शेतात पोहोचले, तोपर्यंत बिबट्याने चिमुकल्याचे प्राण घेतले होते.

{आणखी वाचा-काय! PM किसान योजनेत 'एवढ्या' बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन पैसे खाल्ले.}

हाती आलेल्या माहितीनुसार, मृत चिमुकल्याचे नाव सार्थक संजय बंधूवत असे आहे. जेव्हा सार्थकचा मृतदेह सापडला तेव्हा तो उपचारासाठी नेण्यायोग्य नव्हता. कारण तो आधीच मृत झाला होता. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसातील ही तिसरी घटना आहे. पंधरा दिवसापासून बिबट्याने या भागात कहर माजवला आहे. आठ दिवसांपूर्वी बिबट्याने एका आठ वर्षाच्या चिमुकल्याला आपली शिकार बनवले होते. एवढेच नव्हे तर याच्या एका आठवड्या अगोदर बिबट्याने एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला आपली शिकार बनवले होते. 


सार्थकचा मृतदेह मिळाल्यानंतर वनविभागाने नाराजी व्यक्त केली. जर या मनुष्यभक्षक बिबट्याला जर आधीच पकडले असते, तर चिमुकल्याचे प्राण वाचले असते, असे वनविभागाने म्हटले आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, तीन बालकांच्या मृत्यूनंतरही वनविभाग झोपले आहे का? वनविभागाने आतातरी काही ऍक्शन घ्यायला हवे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या