बस कंडक्टरचे घाणेरडे कृत्य, चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवायचा आणि त्याचे व्हिडीओ काढून पॉर्न वेबसाईटवर अपलोड करून कमावले हजारो डॉलर.

 

बस कंडक्टरचे घाणेरडे कृत्य, चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवायचा आणि त्याचे व्हिडीओ काढून पॉर्न वेबसाईटवर अपलोड करून कमावले हजारो डॉलर.

क्राईम ब्रँच टीमने एका व्यक्तीस महिलांचा शारीरिक छळ केल्याच्या आणि त्याचे व्हिडीओ काढून पॉर्न वेबसाईटवर अपलोड केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हा व्यक्ती एक बस कंडक्टर असून तो ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट(TMT) येथे बस कंडक्टर म्हणून काम करतो. हा व्यक्ती भोईसर येथे राहत असून, मिलिंद अनिल झाडे अशी या व्यक्तीची ओळख झाली आहे. 


तपासणी दरम्यान निदर्शनास आलेली माहिती...

आरोपीने शिव वैशाली नावाची एक वेबसाईट तयार केली होती. या वेबसाईटवर आरोपी एडल्ट कंटेंट अपलोड करत होता. आणि हे एडल्ट कंटेंट पाहण्यासाठी लोकांकडून पैसे वसुलत होता. आरोपीच्या वेबसाईटवर बऱ्याच मुलींचे व्हिडिओ क्राईम ब्रांचला सापडले आहेत. हे सर्व व्हिडीओ आरोपीने हिडन कॅमेऱ्याने टिपल्याचे समजले आहे.

{आणखी वाचा-घराबाहेर झोपलेला चिमुकला बिबट्याचा शिकार, 15 दिवसात 3 चिमुकले बिबट्याचे शिकार.}

तपासणी दरम्यान असेही निदर्शनास आले की आरोपीने हे व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करून हजारो डॉलरची कमाई केली आहे. जास्त करून महिलांना आरोपी लाखांची नोकरी देतो असे आमिष दाखवून फसवत असे. शारीरिक शोषण झालेल्या मुलींपैकी एक मुलगी पिज्जा स्टोरमध्ये काम करत होती. तिला चांगल्या नोकरीचे अमिश दाखवून आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तो व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड केला. मुलीच्या एका नातेवाईकाने चुकून तो व्हिडिओ पहिला. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला.


त्यानंतर बस कंडक्टरवर विक्रमगड पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराची केस दर्ज केली गेली आहे. यापुढे प्रकरणाची तपासणी केली असता, क्राईम ब्रांचला अनेक मुलीला आरोपीने फसवल्याचे कळले. आणखी एका मुलीने पुढे येऊन आरोपीविरुद्ध वालीव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. नोव्हेंबर 2019 ते जून 2020 या कालावधी दरम्यान आरोपीने एका 30 वर्षीय महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते.

{आणखी वाचा-काय! PM किसान योजनेत 'एवढ्या' बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन पैसे खाल्ले.}

आरोपी आपली कामाची जागा सतत बदलत असे. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती सापडत नव्हता. गुरुवारी स्थानिक क्राईम ब्रांचला आरोपी पचमाड येथे आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला पचमाड येथील घरून अटक केली. बलात्कार वगळता आरोपीवर आयटी ऍक्टच्या बऱ्याच धारांमार्फत गुन्हा नोंदवला गेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या