लग्नाच्या चार वर्षांनंतरही मुल झाल नाही म्हणून केली बायकोची हत्या,हुंड्यासाठीपण छळ केला जात होता.

 

लग्नाच्या चार वर्षांनंतरही मुल झाल नाही म्हणून केली बायकोची हत्या,हुंड्यासाठीपण छळ केला जात होता.

गौरी नावाच्या मुलीचे लग्न चार वर्षांपूर्वी श्याम मुखीया नावाच्या व्यक्ती सोबत झाले होते. लग्नाच्या चार वर्षानंतरही तिला मुलबाळ झाले नव्हते. मुलबाळ न झाल्याची सजा तिला मृत्यूच्या रूपाने मिळाली. तिला ही सजा दुसरं कोणी नाही तर तिचाच पती श्याम मुखीया आणि तिच्या सासरच्या व्यक्तीनी दिली आहे. तिच्या पतीचे नाव श्याम मुखीया, सासूचे नाव दाई देवी आणि सासऱ्याचे नाव शिवजी मुखीया असे आहे. या सर्वांनी मिळून गौरीला मृत्यूच्या दारात ढकलले. हत्या केल्यानंतर तिच्या शवाला जाळण्याच्या उद्देशाने मल्लाह टोल्याच्या बांधावर घेऊन गेले. शवाला अग्नी देण्याचे कारस्थान चालू असताना पोलिसांना गुप्त रूपाने माहिती मिळाली. 

{आणखी वाचा-भाजपच्या सभेत वृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले, "तरीही भाषण सुरूच होते आणि भाजपचे नेते निर्लज्जपणे टाळ्या वाजवत होते."}

ठाणा अध्यक्ष मनोज कुमार यांना सूचना मिळताच त्वरीत कारवाई करत घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येत आहेत, हे कळताच सर्व लोक शवाला सोडून फरार झाले. पोलिसांनी शव ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टेम साठी हॉस्पिटलमध्ये पाठवले. सोबतच गौरीचे नवहत बैका येथील निवासी असलेले पिता यांना घटनेची माहिती दिली. गौरीच्या पित्याने नाव रवी असे आहे.


पती फरार...

ठाणा अध्यक्ष मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गौरीच्या पित्याने तिच्या सासरच्या व्यक्तीवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी सासू आणि सासऱ्याला अटक केली आहे. घटनेनंतर गौरीचा पती श्याम मुखीया हा फरार झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे.


छळ करत असल्याची माहिती पित्याने दिली...

मृत गौरीच्या वडिलांनी सांगितले, की 2016 मध्ये गौरीचे लग्न बुधन झा टोला येथील निवासी शिवजी मुखीया यांचा मुलगा श्याम मुखीया याच्यासोबत मोठ्या धुम धुमधडाक्यात झाले होते. लग्नाला काहीच दिवस झाले होते. थोड्याच दिवसानंतर तिच्या सासरच्या व्यक्तीकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता. खूप वेळा गौरीनेही छळ होत असल्याचे सांगितले होते, की "सासरच्या व्यक्तीकडून हुंड्यासाठी छळ केला जात आहे".


याव्यतिरिक्त तिला मुलबाळ होत नसल्याने सतत मारहाण केली जात होती. असे असताना पती आणि तिच्या घरच्यांनी मिळून रविवारी तिची हत्या केली. आणि साक्ष लपवण्यासाठी तिच्या शवाला अग्नी देण्याचा प्रयत्न केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या