भाजपच्या सभेत वृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले, "तरीही भाषण सुरूच होते आणि भाजपचे नेते निर्लज्जपणे टाळ्या वाजवत होते."

 

भाजपच्या सभेत वृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले, "तरीही भाषण सुरूच होते आणि भाजपचे नेते निर्लज्जपणे टाळ्या वाजवत होते."

खंडवा(मध्यप्रदेश)-मध्यप्रदेशात विधानसभा पोटनिवडणूका चालू आहेत. यासाठी राजकीय नेत्यांच्या प्रचार जोमात चालू आहे. अशातच एका शेतकऱ्याचे खंडवा जिल्ह्यातील मंधाता विधानसभा पोटनिवडणुकीसाठी चालू असलेल्या प्रचार सभेत निधन झाले. मध्यप्रदेशात आता यावरून वातावरण तापले आहे. ज्योतिरातीत्य शिंदे हे या सभेत प्रचारासाठी पोहोचले होते.

प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी भाजपचे स्टार प्रचारक ज्योतिरातीत्य शिंदे हे रविवारी प्रचार सभेला आले. स्थानिक नेत्याची भाषण शिंदे येण्यापूर्वी चालू होती. भाजपचे आमदार राम दांगोरे हे भाषण देत असताना तेथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले. निधन झालेल्या या शेतकऱ्याचं जीवनसिंह असे नाव होते. जीवनसिंह यांचे वय 80 वर्ष होते.


शेतकऱ्याचं निधन झालं तरीही भाषण सुरूच...

शेतकऱ्याचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या जवळच्या खुर्चीवर बसलेले नागरिक उठून बाजूला झाले. जवळचे सर्व नागरिक पांगले. तेथे काय झाले हे नेत्यांच्या लक्षात आले तरीही नेत्यांची भाषण सुरूच होती. ज्योतिरातीत्य शिंदे हेदेखील थोड्यावेळाने सभेत पोहोचले. ज्योतिरातीत्य शिंदे यांना झालेला प्रकार कळला. तसेच शेतकऱ्यांच्या निधनाची माहिती मिळाली. यावेळी भाषण चालू करण्याआधी ज्योतिरातीत्य शिंदे यांनी एक मिनिटांचा मौन पाळला आणि नंतर भाषणाला सुरुवात केली. जीवनसिंह हेदेखील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांपैकी असल्याचं सांगितलं जातंय. जेष्ठ आणि वृद्ध नागरिकाना कोरोना संसर्गामुळे गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे. मग जीवनसिंह हे या सभेत आलेच कसे?आणि सभेत यायला त्यांना सभेत येण्याची परवानगी त्यांना कशी काय मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


काँग्रेसने साधला शिंदेंवर निशाणा...

ज्योतिरातीत्य शिंदे यांच्या सभेत शेतकऱ्याचे निधन झाले. "याकडे दुर्लक्ष करून जाहीर सभा सुरूच ठेवली" असा काँग्रेसचा आरोप आहे. सभा निधनानंतरही का सुरू ठेवण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करत, काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात मध्यप्रदेश काँग्रेसने एक ट्विट केला आहे. ट्विटमध्ये "जनता से न सही, भगवान से तो डरो.." असेही लिहिले आहे.

{आणखी वाचा-लग्नाच्या चार वर्षांनंतरही मुल झाल नाही म्हणून केली बायकोची हत्या,हुंड्यासाठीपण छळ केला जात होता.}

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या