वसमत तालुक्यातील बोराळा येथे एक दिवसाआड एक अश्या दोन आत्महत्या

 

वसमत तालुक्यातील बोराळा येथे एक दिवसाआड एक अश्या दोन आत्महत्या

पहिली घटना

सततची नापिकी व बँकेचे कर्ज कसे फेडावे या तणावामुळे प्रभाकर प्रल्हाद जाधव (रा.बोराळा ता.वसमत व्ययवर्षे 32) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अनंता बाबुराव जाधव यांनी ग्रामीण पोलिस येथे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. बंदखडके,पोलिस कर्मचारी कोकरे व भुरके करत आहेत.

दुसरी घटना
वसमत तालुक्यातील मारूती मंदिर देवस्थानासाठी प्रसिध्द असलेल्या बोराळा येथे एक दिवसाआड एक अश्या दोन व्यक्तिंनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करणारे हे व्यक्ती एकजण तरुण तर एकजण शेतकरी असल्याचे कळले आहे. या घटनेने सर्व वसमत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कांताबाई बालाजीराव खराटे(रा.बोराळा ता.वसमत व्ययवर्षे 42) यांनी वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती दिली आहे. संतोष बालाजीराव खराटे
( रा.बोराळा ता.वसमत व्ययवर्षे 22) असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे वर्णन आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?
मयत तरुणाच्या आईने भावाच्या शेतावर दावा दाखल केला होता. हा दावा का दाखल केला,या कारणावरून तरुणाला बोराळा गावातीलच इतर चार जणांकडून धमक्या दिल्या जात होत्या. या धमक्यांना व त्रासाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत ग्रामीण स्टेशन येथे तक्रार नोंदवली गेली3 आहे.पुढील तपास स.पो.नि. बंदखडके,पोलिस कर्मचारी कोकरे व मिराशे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या