बर्थडे पार्टीत एकमेकांवर अंडे फेकणे पडले चांगलेच महागात,बर्थडेबॉय समवेत 6 जणांचा शोध सुरू.

बर्थडे पार्टीत एकमेकांवर अंडे फेकणे पडले चांगलेच महागात,बर्थडेबॉय समवेत 6 जणांचा शोध सुरू.

 आजकाल एक नवीन सण सुरू झाला आहे.सण किंवा प्रथा म्हणा.कोणाचाही बर्थडे साजरा केला जातोय.शहरापासून ते पार खेडेगावापर्यंत लहान-मोठ्यांचे बर्थडे साजरे करतात. बर्थडे साजरे करताना केक आणला जातो. केक कापल्यावर एक छोटीशी पार्टी ठेवली जाते.आणि मग धिंगाणा सुरू होतो.चेहऱ्यावर केक लावणे,अंगावर अंडे फेकणे याप्रकरणाची कार्यक्रम चालू होतात. पण आता कोरोना काळात असले उद्योग गळीस लागणार आहेत.


बर्थडे पार्टीत एकमेकांवर अंडे फेकणे काही युवकांना चांगलेच महागात पडले आहे. बातमी पुण्यातील नारायणगाव येथील आहे.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतः या घटनेची चौकशी करून कार्यवाही केली आहे. बर्थडे बॉय समवेत इतर 6 जणांवर शांतिभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांतर्गत या 6 जणांचा तपास सुरू आहे.


ही घटना रविवारी रात्री उशिरा 12 च्या सुमारास जुन्नर तहसील क्षेत्रात असलेल्या नारायणगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सकलेन नासिर आतार,अरमान खालिद शेख,शाकिर आमीन जमादार,मोईन एकलाक आतार,मोहसीन फिरोज इनामदार आणि जालिद पीर मोहम्मद पटेल अशी नावे असलेल्या युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक केली नाही पण ह्या युवकांची शोध प्रक्रिया सुरू आहे.


नारायणगाव पोलिस स्टेशनमकडून मिळालेल्या माहितीनुसार सकलेन नासिर आतार नावाच्या युवकाचा वाढदिवस होता.त्याच्या बर्थडे पार्टीत हा कल्लोळ झाला होता.कोरोना परिस्थितीमुळे आताही शहरात लॉकडाऊनचे लागू आहेत.त्यामुळे अशा प्रकारच्या पार्ट्या करण्याची अनुमती अद्याप देण्यात आली नाही.आणि अर्ध्या रात्री भर रस्त्यात पार्ट्या करण्यास बंदी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या