'मुंबईत फुकट जमीन मिळतेय' अशी अफवा उडाली अन ताबा करायला शेकडो लोक खाली जमिनीवर टेंट लावून बसले.

'मुंबईत फुकट जमीन मिळतेय' अशी अफवा उडाली अन ताबा करायला शेकडो लोक खाली जमिनीवर टेंट लावून बसले.

 मुंबई:मधील विक्रोळी भागातील ही घटना आहे. या भागात जमीन मोफत मिळत आहे, अशी अफवा सोमवारी पसरली. मग काय मोफत म्हटल्यावर खाली जमिनीवर ताबा मिळवन्यासाठी शेकडो लोक पोचले. हे लोक विक्रोळीच्या बाहेरील भागात असलेल्या खाली जमिनीवर पोचले. आणि तिथे आपापले टेंट लावले. माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाने या लोकांना खूप वेळा समजावले की ही जमीन मोफत मिळत नाहीये.तरीपण मंगळवारी सकाळी पर्यंत लोक काही जायला तयार नव्हते.


विक्रोळी पोलिसांच्या माहितीनुसार,सोमवारी अशी अफवा पसरली की, 100 एकर जमीन असलेल्या मालकाचा मृत्यू झाला आहे, आणि त्या मालकाची मुलगी ही 100 एकर जमीन दान करत आहे.या अफवेत असेपण म्हटले गेले की,जे लोक या जमिनीवर अतिक्रमण करतील त्यांना ही जमीन फुकटात मिळणार आहे. तपासणी केली असता असे निदर्शनास आले की, ही जमीन सरकारी असून कोणीतरी विनोद करण्याच्या दृष्टीने ही अफवा पसरवून खळबळ उडवली. घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही.


विक्रोळी पोलिसांनी BMC कर्मचाऱ्यांसोबत मिळून काही जमिनीवरील अतिक्रमण हटवले आहे. काही लोक मात्र मोफत जमीन मिळण्याच्या आशेने जमीन सोडायला तयार नाहीत. शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांनी म्हटले की- आम्ही सरकारी जमिनीवर लोकांना अतिक्रमण करण्याची परवानगी देऊ शकत नाहीत. अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी 300-400 वर्ग फूट जमिनीवर कब्जा केल्याचे तपासणीत दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या