रक्तदान करा आणि एक किलो चिकन मोफत मिळवा-शिवसेनेची अनोखी ऑफर

 

रक्तदान करा आणि एक किलो चिकन मोफत मिळवा-शिवसेनेची अनोखी ऑफर

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे नेते लोक रक्तदान शिबीरांचे आयोजन करत आहेत. सध्या कोरोनामुळे कोणी सहजासहजी रक्तदान करण्यास तयार होत नाही.रक्तदान करण्याआधी नागरिकांची कोरोना तपासणी केली जात आहे.त्यात जर कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला तर विलगीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कोणी सहजासहजी रक्तदान करायला समोर येत नाही.

(हे वाचा-धावत्या ट्रकला लागली आग,चालकाने उडी मारून कसाबसा जीव वाचवला)

त्यामुळे नेते लोक रक्तदान करणाऱ्यास भेटवस्तू देत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. रक्तदान करण्याऱ्या व्यक्तीस जर तो मांसाहारी असेल तर त्याला एक किलो कोंबडीचे चिकन आणि शाकाहारी असेल तर पनीर देण्याचे जाहीर केले आहे.नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबीरात भाग घ्यावा यासाठी त्यांनी ही ऑफर जारी केली आहे.हे रक्तदान शिबीर वरळी विधानसभा क्षेत्रात आयोजित केले आहे. शिबीर 13 डिसेंबर रोजी न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी  मैदानात पार पडणार आहे. या रक्तदान शिबिरात भाग घेण्यासाठी नागरिकांना शिवसेना शाखा क्र.194 मध्ये 11 डिसेंबरच्या आत नावनोंदणी करावी लागणार आहे.


रक्तदात्याला रक्तदान केल्यावर एखादी चांगली भेटवस्तु दिली जाते. रक्तदात्याच्या चांगल्या आरोग्यासाठी त्याला एखादा चांगला पदार्थ दिला जावा. त्यातूनच चिकन देण्याची ही कल्पना सुचली आहे.त्यामुळे मांसाहारी रक्तदात्याला एक किलो कोंबडीचे चिकन आणि शाकाहारी रक्तदात्याला पनीर देण्याचा हा निर्णय घेतला आहे. असे समाधान सरवणकर यांनी म्हटले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या