धावत्या ट्रकला लागली आग,चालकाने उडी मारून कसाबसा जीव वाचवला

 

धावत्या ट्रकला लागली आग,चालकाने उडी मारून कसाबसा जीव वाचवला

घटना पुण्यातील चांदणी चौक परिसरातील आहे. शनिवारी सायंकाळी एका धावत्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रक चालकाने चालत्या ट्रकमधून उडी मारुन कसाबसा आपला जीव वाचवला. आग लागल्यानंतरही काही वेळ ट्रक तसाच रस्त्यावर धावत होता,असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.


शनिवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे वारजे ब्रिजवर वाहनांची लांबच लांब रांग जमली होती. या घटनेमुळे तब्बल 1 तासभर ट्रॅफिक जॅम झाली होती.


इंजिनमधील खराबीमुळे लागली आग

महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यंत ट्रकचा पुढचा भाग जळूल खाक झालेला होता. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार ट्रकच्या इंजिनमध्ये खराबी आल्यामुळे ही आग लागली होती. चालकाने चालत्या ट्रकमधून उडी मारल्याने त्याला किरकोळ मार लागला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या