नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत कोरोना संक्रमणच्या बाबतीत जगात #1 ला जाईल, पण....

 

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत कोरोना संक्रमणच्या बाबतीत जगात #1 ला जाईल, पण....

गुरुवारी दिनांक 08 ऑक्टोबर रोजी 69887 नविन रुग्ण आढळून आले. 77248 रुग्ण बरे होऊन घरी परतले आणि 980 रुग्णांचा मृत्यू झाला.

देशभरात आतापर्यंत 1.03 लाख रुग्ण मृत्यू पावले, आतापर्यंत 59.03 लाख रुग्ण रिकव्हर झाले.


देशात आता दररोज 70 ते 80 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. जर संक्रमनाची गती अशीच चालू राहिली, तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारत हा कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत जगात #1 ला जाईल.  आताच्या संख्येनुसार आणि वाढत्या रुग्ण संख्येनुसार देशात कोरोना रुग्ण संख्या 07 नोव्हेंबरपर्यंत 91 लाख 70 हजारवर पोहोचेल. जी की जगात एक नंबरवर असेल. अमेरिकेत आता दररोज 40 ते 50 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यानुसार 07 नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेतील रुग्ण संख्या ही 91 लाख 40 हजार होईल.


भारतात दररोज वाढणाऱ्या संख्येच्या तुलनेत 30 ते 35 हजारांची कटोती झाली आहे. एक वेळ होती जेव्हा दररोज 90-97 हजार संक्रमण संख्या वाढत होती. तीच आता 70-80 हजारांवर येऊन पोहोचली. ऍक्टिव्ह रुग्णसंख्यासुध्दा मागील दोन आठवड्यांपासून लगातार कमी होत आहेत.


17 सप्टेंबरला देशात ऍक्टिव्ह केस 10.17 लाख होते,ते आता कमी होऊन 8.93 लाखांवर पोहोचले आहे. मृत्यूच्या दरसुद्धा कमी झाला आहे. जिथे 1 हजारच्यावर रुग्ण मृत्यू पावत होते, ती संख्या आता हजार पेक्षा कमी झाली आहे. हा देशासाठी एक चांगला संकेत आहे.


देशात आतापर्यंतचा कोरोनाचा आकडा 69 लाख 3 हजार 812 एवढा झाला आहे. त्यापैकी 59 लाख 3 हजार 207 रुग्ण बरे झाले आहेत. आणि आता 8 लाख 93 हजार 41 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 17 सप्टेंबरपर्यंत हीच संख्या 10 लाख 17 हजारापेक्षाही जास्त होती. कोरोना संक्रमानामुळे आत्तापर्यंत 1 लाख 6 हजार 521 लोकांचा मृत्यू झाला आहे.एकंदरीत आपला देश हळूहळू कोरोनाला हरवत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या