मोदींच्या "ह्या" मित्राचं तथा एका केंद्रीय मंत्र्याचं काल निधन झालं, दोन वेळा झाली होती हार्ट सर्जरी....

 


मोदींच्या ह्या मित्राचं तथा एका केंद्रीय मंत्र्याचं काल निधन झालं, दोन वेळा झाली होती हार्ट सर्जरी....


केंद्रीय मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांचं काल म्हणजे गुरुवारी दि:- 08 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, आणि दिल्लीच्या एस्कार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांना देवाज्ञा झाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासवान यांच्या निधनानंतर आपलं दुःख व्यक्त केले. मोदी म्हणाले की "मी माझे दुःख शब्दांत मांडु शकत नाही".ते असेही म्हणाले की मी माझा एक खास मित्र गमावला. मोदींचा मंत्रिमंडळात पासवान हे सर्वात वृद्ध मंत्री होते.


पित्याच्या निधनानंतर त्यांच्या मुलगा असलेल्या चिरागने गुरुवारी रात्री 8 वाजून 40 मिनिटाला एक भावनिक ट्विट केला. ट्विट मध्ये त्याने आपल्या बालपणीचा एक फोटो अपलोड केला.


त्याचबरोबर मोदींनीही ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.



‌दोन वेळेस हार्ट सर्जरी झाली होती.
11 सप्टेंबर रोजी रामविलास पासवान हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. 2 ऑक्टोबर रोजी त्यांची हार्ट सर्जरी झाली. ही त्यांची दुसरी हार्ट सर्जरी होती. या अगोदर पण त्यांची एक बायपास सर्जरी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा,संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चिराग पासवानला फोनवर रामविलास पासवान यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली होती.


रामविलास पासवान यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होताना 3 ट्विट केले. ते म्हणाले की मी माझा मुलगा चिराग याच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या