मुंबई-हॉस्पिटलमधून वीज गायब,जनरेटरने पेट घेतला, हॉस्पिटलमधून हलवण्यात आलेल्या रुग्णाचा मृत्यू...

 

मुंबई-हॉस्पिटलमधून वीज गायब,जनरेटरने पेट घेतला, हॉस्पिटलमधून हलवण्यात आलेल्या रुग्णाचा मृत्यू...
Image source-maharashtratimes

मुंबई/मुलुंड-मुंबईतील मुलुंड येथे असलेल्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये सोमवारी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आग लागली. त्यामुळे खळबळ उडाली. प्रसंगी हॉस्पिटलमध्ये असलेल्या 40 रुग्णांना जवळच्या अन्य हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले. मात्र यापैकी एका रुग्णाचा यात मृत्यू झाला असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.


सकाळी 10 वाजता मुंबईतील वीजपुरवठा ठप्प झाला होता. अन्य भागातील वीज पुरवठा दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्वरत झाला होता. पण मुलुंड,भांडुप या भागातील वीजपुरवठा ठप्पच होता. त्यामुळे या भागात असलेल्या रुग्णालयांना जनरेटरचाच आधार होता. अपेक्स हॉस्पिटलमध्येही जनरेटर सुरू होते. पण यंत्रालाही काही मर्यादा असतात. खूप वेळ जनरेटर चालू असल्याने ते गरम होऊन त्यात आग लागली. जनरेटरने पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला. अग्निशामक दलाकडून या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे.


15 मिनिटांत आग नियंत्रणात...

मुलुंडच्या विनानागरमध्ये अपेक्स हॉस्पिटल असून,हॉस्पिटलमध्ये आग लागली अशी माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दल घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर युद्ध पातळीवर मदतकार्य करत हॉस्पिटलमध्ये असलेल्या सर्व रुग्णांना सुखरूपपणे हॉस्पिटल मधून बाहेर काढले.त्यावेळी हॉस्पिटलमध्ये एकूण 40 रुग्ण होते. त्या सर्व रुग्णांना जवळच्या तीन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. फॉरटीस,मुलुंड जंबो सेंटर व आस्था हे तीन हॉस्पिटल सामील आहेत. हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी अतोनात प्रयत्न केले. आणि अवघ्या 15 मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले.


एका रुग्णाचा मृत्यू...

दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेल्या रुग्णापैकी त्यातील एका रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जर वीजपुरवठा चालू असता/खंडित झाला नसता तर दगवलेल्या रुग्णाचे प्राण वाचले असते, असेही बोलले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या