खळबळजनक घटना..! पाचवीतल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, आईवडीलांनी केला आरोपींवर हमला...

 

खळबळजनक घटना..! पाचवीतल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, आईवडीलांनी केला आरोपींवर हमला...

झारखंड/गुमला-

झारखंडमध्ये गुमला येथील एका 5वी वर्गात शिकत असलेल्या मुलीवर 5 नराधमांनी रात्रभर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी मुलीच्या घरून तिचे अपहरण केले होते. ही घटना शनिवारी रात्री उशिराची आहे. रविवारी हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. असे म्हटले जात आहे की, या घटनेचा खुलासा तेंव्हा झाला,जेंव्हा पीडित मुलीच्या आईवडीलांनी आरोपिंवर जीवघेणा हमला केला. दोन आरोपीचे हातपाय तोडण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. जेव्हा दोन्ही आरोपी घायाळ होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

{मुंबई-हॉस्पिटलमधून वीज गायब,जनरेटरने पेट घेतला, हॉस्पिटलमधून हलवण्यात आलेल्या रुग्णाचा मृत्यू...}

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, घटना घडल्यानंतर गावात एक पंचायत बोलावण्यात आली.यात आरोपींकडून आपल्यावर केस करू नये म्हणून, पीडित परिवारावर दबाव आणला गेला. मुलीला जीवे मारण्याची आणि घराला आग लावण्याची धमकीही देण्यात आली. घटनेसंबंधी चैनपूरचे SDPO मंगळवारी दुपारी प्रेस कॉन्फरन्स करणार आहेत. 


पीडित आणि आरोपी वेगवेगळ्या समुदायाचे...

पीडित आणि आरोपी वेगवेगळ्या समुदायाचे आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही समुदायामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणात आहे. मुलीच्या आईवडीलांना जेव्हा कळले तेव्हा, त्यांनी आरोपींवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने आरोपीच्या हातापायावर वार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या