ऑनलाइन क्लासमध्ये अज्ञातांनी पाठवले अश्लील व्हिडीओ,जीवे मारण्याची धमकीही दिली.

 

ऑनलाइन क्लासमध्ये अज्ञातांनी पाठवले अश्लील व्हिडीओ,जीवे मारण्याची धमकीही दिली.

पुणे:येथे 15 वर्षांची विद्यार्धिनी ऑनलाइन अभ्यास करताना अश्लील व्हिडीओ पाठवणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकरण समोर आले आहे. ह्या प्रकारानंतर विद्यार्धिनीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्धिनी आणि तिचे सोबती अभ्यास करत होते.सध्या कोरोना परिस्थिती असल्याने ते सर्वजण ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स अँपच्या मदतीने ऑनलाइन अभ्यास करत होते. यातच विद्यार्धिनीला प्रायव्हेट मॅसेजच्या साहाय्याने  हे व्हिडीओ पाठवले गेले होते. एवढेच नव्हे तर विद्यार्धिनीचे वडील आणि शाळा शिक्षक यांनाही असेच व्हिडीओ पाठवले गेले होते.


याआधी पण अश्लील संदेश पाठवले होते,

तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की,अज्ञातांचे हे कारस्थान जुनेच आहे. याआधी पण असले घाणेरडे कृत्य अज्ञातांनी केले होते. यावर्षीच्या जून महिन्यातही असले अश्लील संदेश त्यांना पाठवले गेले होते. त्यानंतर तेव्हाही आई-वडीलांनी पोलिसात तक्रार केली होती.तेंव्हाही तपासणी करण्यात आली होती. तपासणी अंतर्गत काहीही सापडले नाही.त्यामुळे त्यावेळी हे प्रकरण बंद करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यात कोणतेही संदेश किंवा व्हिडीओ पाठवले गेले नव्हते. पण रविवारी पुन्हा तसलेच संदेश पाठवले गेले आहेत.


जीवे मारण्याच्या धमकीचाही उल्लेख,

भोसरी पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, मुलीचे वडील आणि शाळा शिक्षक यांनाही अश्लील संदेश पाठवले गेले आहेत. 'एवढेच नव्हे तर या संदेशांमध्ये असे बरेच संदेश आढळून आले आहेत, की ज्यामध्ये जीवे मारण्याच्या धमकीचाही उल्लेख केला गेला आहे'. याचा अर्थ असा आहे की, संदेश पाठवणाऱ्याने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. संदेश पाठवणाऱ्याने मुलीला आत्महत्या करण्यासदेखील उकसावन्याचा प्रयत्न केला आहे. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपासणी चालू आहे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या