VIDEO-पवारांच्या वाढदिवसाचा केक खायला गर्दीच गर्दी झाली.राणेंनी दिला टोला.

 

पवारांच्या वाढदिवसाचा केक खायला गर्दीच गर्दी झाली.राणेंनी दिला टोला.

दिनांक 12/12/2020 रोजी मा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस होता. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेत्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही एक कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमात एकच झुंबड उडाली.कार्यक्रम संपल्यानंतर केक खाण्यासाठी स्टेजवर लोकांची गर्दीच गर्दी जमली. या कार्यक्रमानंतर आणि घडलेल्या ह्या घटनेनंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर ट्विट करत आयोजकांना टोला दिला आहे.


धनंजय मुंडे यांनी परळी मतदार संघात मा.पवारांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता गोविंदा सुध्दा आला होता. त्यामुळे कार्यक्रमाला चांगली गर्दी जमली होती. मा.पवारांच्या वाढदिवसानिमित्त 81 किलोचा केकही आणला होता.काही वेळानंतर नेत्याची भाषणे आणि कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपताच केक खाण्यासाठी स्टेजवर लोकांची गर्दी जमली. लोक एकमेकांच्या अंगावर पडू लागले.झालेली गर्दी आणि झुंबड पाहून आयोजकांनी स्टेजकडे धाव घेतली आणि गर्दी आटोक्यात आणली. निलेश राणे यांनी हाच पॉइंट पकडून निशाणा साधला आहे. 


राणेंनी ट्विटमध्ये म्हटले- मन खचून गेले हे बघून... महाराष्ट्रात ६० वर्षामध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात, काहीना स्वतंत्र महाराष्ट्राचे जाणते राजे काही लोकं म्हणतात, त्या ६० वर्षाच्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या