एक शेतकऱ्याला आलं 26 लाखाच वीजबिल, विजविभागाचा बेजबाबदारपणा

 

एक शेतकऱ्याला आलं 26 लाखाच वीजबिल, विजविभागाचा बेजबाबदारपणा

साधारणत: वीजबिल किती येत असत? हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण उत्तर प्रदेश वीज विभागाच्या बेजबाबदारपणामुळे एका शेतकऱ्याला चक्क 26 लाखाच वीजबिल आलं आहे. 


सदर शेतकऱ्याच्या घरी वीज वितरण विभागाने तब्बल 26 लाखाच वीजबिल पाठवले आहे. आलेलं हे वीजबिल पाहून शेतकरी आश्चर्यचकित झाला. त्याला काय करावे काही सुचेनासे झाले. एवढं बिल आलं कसं हे त्याला समजेना. त्याचे कुटुंबीयसुद्धा चक्रावून गेले. सर्वजण एकाच चिंतेत बुडाले,की एवढं बिल आलं कस? 


26 लाखाच वीजबिल प्राप्त करणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव रामू राठोड असे आहे. रामू राठोड हा गंगाघट पोलीस स्थानक क्षेत्रात असलेल्या बेहाटा या गावचा रहिवासी आहे. रामुच्या घरी 4 डिसेंबर रोजी वीज विभागाने 26 लाखाच वीजबिल पाठवले. हे बिल पाहून शेतकरी समवेत सर्व कुटुंबीय चक्रावले. यासंदर्भात विचारपूस करण्यासाठी रामू जवळजवळ रोज वीज विभागाच्या फेऱ्या मारत होता. पण त्याची कोणही दखल घेत नव्हते. त्याची तक्रार कोणीही गांभीर्याने घेत नव्हते. रामूने दिलेल्या माहितीनुसार रामू हा भूमिहीन शेतकरी आहे. त्याला पाच मुली आहेत. त्यांच्या लग्नाची जबाबदारी त्याच्या एकट्यावर आहे. तसेच त्याच्या घरी फ्रिज,कूलर यांसारख्या चैनीच्या वस्तूसुद्धा नाहीत. त्यामुळे हे बिल कसे आले हे त्याला ठाऊक नसल्याचे सांगितले. वीज विभागाने त्वरीत याबाबत निर्णय घ्यावा असे रामुचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या