नवरदेवाने मेहंदीने लिहिले'किसान एकता जिंदाबाद'गाडीवर लावला शेतकऱ्यांचा झेंडा

 

नवरदेवाने मेहंदीने लिहिले'किसान एकता जिंदाबाद'गाडीवर लावला शेतकऱ्यांचा झेंडा

नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने आंदोलनात सहभागी होत आहे. पंजाबमधील शेतकरी पुत्राने आंदोलनाला पाठिंबा दाखविण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्या शेतकरी पुत्राचे आज लग्न होते. लग्न असल्यामुळे त्याला आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवता आला नाही. पण त्याने आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी लग्नात आपल्या हातावर मेहंदीने 'किसान एकता जिंदाबाद' असे लिहिले आहे. वऱ्हाडी मंडळींना आणण्या-नेण्यासाठीच्या गाड्यावर शेतकऱ्यांचा झेंडा लावला आहे.


पंजाबमधील मुक्तसर साहिब या शेतकरी पुत्राचे लग्न झाले.हा पुत्र आणि त्याचा परिवार शेतकरी आंदोलनाचे कट्टर समर्थक आहेत. म्हणून त्याने ही शक्कल लढवली आहे. लग्नात लावण्यात येणाऱ्या मेहंदीलाच आंदोलनाच्या समर्थनाचे माध्यम बनवले आहे.



नवरदेवाने म्हटले की, शेतकरी आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. मीसुद्धा शेतकरी परिवारातील एक व्यक्ती आहे. त्यामुळे मी माझ्या शेतकरी बांधवासोबत उभा आहे. मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की सर्वांनी मिळून दिल्लीला जावं. जे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यांना साथ द्यावी.त्यांची हिंमत वाढवावी. ज्यामुळे नवीन कृषी कायदे रद्द होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या