मागण्या पूर्ण नाही झाल्या तर देशभरात रेल्वे रोको आंदोलन केले जाईल,तारीख लवकरच सांगण्यात येईल-शेतकऱ्यांची नवी घोषणा

 

मागण्या पूर्ण नाही झाल्या तर देशभरात रेल्वे रोको आंदोलन केले जाईल,तारीख लवकरच सांगण्यात येईल-शेतकऱ्यांची नवी घोषणा

नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा एक 16वा दिवस आहे. शेतकरी नेता बुटा सिंह यांनी म्हटले आहे की नवीन कृषी कायदा रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय नाही घेतला. म्हणून देशभर रेल्वे रोको आंदोलन केले जाईल आणि या आंदोलनाची तारीख लवकरच सांगण्यात येईल. शेतकरी नेता बलविर सिंह राजेवाल यांनी म्हटले की, शेती हा राज्याचा विषय आहे.तर केंद्र सरकार यांवर कसाकाय कायदा लागू करू शकतो?


मोदींनी म्हटले आहे की माझ्या मंत्र्यांचे म्हणणे ऐका

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तौमर आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी शेतकर्यांच्या मागण्यांविषयी पत्रकार परिषद घेतली.मोदींनी ही पत्रकार परिषद सोशल मीडिया ट्विटरवर शेयर केले आहे, आणि म्हटले आहे की माझ्या मंत्र्यांचे म्हणणे ऐका


 आंदोलनात कोरोनाची भीती

शेतकरी आंदोलनात सिंधू बॉर्डरवर आपली ड्युटी करत असलेले दोन IPS ऑफिसर कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. त्यामध्ये एक DCP आणि एका अतिरीक्त DCP चा समावेश आहे. त्यांना त्वरीत त्यांच्या घरी आयसोलेट केले आहे.


पंजाबला जाणाऱ्या 4 रेल्वे गाड्या रद्द

शेतकरी आंदोलन सुरू असल्यामुळे रेल्वे विभागाने गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सियालदह-अमृतसर आणि डिब्रूगड-अमृतसर जाणाऱ्या ह्या दोन गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 13 डिसेंबर रोजी परत येणाऱ्या ह्याच दोन अमृतसर-सियालदह, अमृतसर-डिब्रूगड गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत.


शेतकरी आणि सरकार दोघे वाटाघाटी करण्यास तयार, दोघही पुढाकाराच्या प्रतीक्षेत

शेतकरी आणि सरकार दोघेही एकमेकांच्या पुढाकाराच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनाही वाटते की या प्रश्नाचे उत्तर कधी निघणार आणि सरकारलाही. आंदोलन पुढे कायम ठेवणे योग्य राहणार नाही. सरकारने विचारविनिमय करण्याचा रस्ता बंद केला नाही असे शेतकरी बांधवांचे मत आहे. विचारविनिमय करूनच याचे उत्तर मिळेल. आम्ही सरकारच्या दुसऱ्या प्रजोजलवर विचार करू,असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या